Misal Masala - चटकदार मिसळ
मिसळ. हे नाव डोळ्यासमोर आलं तरी खवय्यांच्या रसना जागृत होतात. तर्रीच्या नुसत्या घमघमाटाने म्हणा किंवा मिसळीच्या दुकानावरून जरी पुढे गेलो तरी तो सुगंध मनाला मोहावतो. आणि मग साहजिकच मिसळ खायची इच्छा बळावते. मोठमोठ्या हॉटेलांपासून ते छोट्या टपरीवर अशी सगळीकडेच मिसळ मिळते. त्या मिसळीत असतं तरी काय तर एका वाडग्यात मटकी, मूग. चणे यापैकी असेल त्या कडधान्याची केलेली तिखटसर उसळ, त्यावर फरसाण, कांदा, कोथिंबीर आणि लालभडक तर्री! या तर्रीवरच तुमच्या फक्कड मिसळीच गणित अवलंबून असतं. मोठमोठ्या हॉटेलमध्ये मिसळीच्या प्रेझेंटेशनवरून ती खायची इच्छा निर्माण होते. मिसळ कशी असावी, किंबहुना ती फक्कड कशी होईल ते नकळत सांगितलं माझे सर मनोज गडणीस यांनी. खाणं आणि उत्तम पदार्थ रांधून खिलवणं, त्यावर तसंच अलवार लिहणं ही त्यांची खासियत. त्यामुळे मीही त्यांनी केलेली मिसळीची पोस्ट वाचून त्या पद्धतीच्या प्रेमात पडले होते. तशी मिसळ करायचा प्रयत्न केला तो बऱ्यापैकी जमला होता. महत्वाचं काय की तिखट आणि मिसळ मसाला कधी घालायचा याबरोबर तर्री जमणं यावर फक्कड मिसळ होणं अवलंबून असतं.
'PSM' चा कांदा लसूण मसाला मागवतानाच 'PSM' चे तिखट आणि मिसळ मसाला घरी आला होता. पाकीट फोडल्यावर तिखटाचा खाट चांगलाच लागला. तर मिसळ मसाल्याचा सुगंधही भारी होता. कधी एकदा मिसळ करतेय असं झालं होतं. ठरल्याप्रमाणे मिसळ करताना आधी मटकीची उसळ केली. (एका दगडात दोन पक्षी मारले. जेवताना उसळ म्हणून आणि नाश्त्याला मिसळ म्हणून करायचं) मटकीची उसळ करताना मात्र थोडा ठसका हवा म्हणून तेल तापल्यावर पहिल्यांदा त्या तेलात तिखट घातलं, अगदी थोडंस परतून मग त्यावर उकडलेली मटकी, मीठ, गुळ, गोडा मसाला घालून उसळ केली. उसळीची चव बघितली तर ती अत्यंत चवदार झाली होती. तेलात तिखट जरी घातलं असलं तरी ती जळजळीत न होता रूचकर झाली होती. आता तर्री करायची होती. त्यासाठी कांदा, सुकं खोबरं, थोडासा टॉमेटो, लसूण असं गॅसवर भाजून घेतलं. गार झाल्यावर ते सगळं मिक्सरमधून काढलं. तेल तापल्यावर आधी हे मिश्रण घालून परतल्यावर मग मिसळ मसाला घातला. तेल सुटल्यावर पाणी घालून चांगली उकळी आणली. त्या उकळीच्या घमघमाटाने घरातल्या सगळ्यांची भूक अनावर झाली.
नवऱ्याने उत्सुकतेने तर्रीची चव बघितल्यावर त्याला तर खूपच आवडली. तर्री फक्कड जमली होती. दिसायला लाल असली तरी जळजळीत अजिबात नाही. 'PSM' च्या मिसळ मसाल्यामुळे खरी रंगत आली. होती. घरचे प्रचंड खूष झाले होते. तुम्हालाही जर घरच्यांना खूष करायचं असेल तर फक्कड मिसळ कराच. मात्र ती करताना 'PSM'चा मिसळ मसाला नक्की वापरा!
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'PSM' चा मिसळ मसाला खरेदी करण्यासाठी लिंक - PSM Misal Masala | PSM Foods (punespice.com)
'PSM' चे लाल तिखट खरेदी करण्यासाठी लिंक - PSM Guntur Red Chilli Powder | PSM Foods (punespice.com)
Author | लेखिका - भक्ती सोमण-गोखले
(लेखिका मुक्त पत्रकार असून, फूड बिझनेस प्रमोशन करणारे Three Cheers हे YouTube चॅनल चालवितात.)
2 Comments
खाण्याच्या सगळ्या पोस्ट एक नंबर असतात…
खाण्याच्या सगळ्या पोस्ट एक नंबर असतात…