ठसका चवदार जेवणाचा - Kanda Lasun Masala
रोज रोज पोळी भाजी! तेच तेच खाऊन कंटाळा आलाय गं, काहीतरी चमचमीत कर ना! हे वाक्य प्रत्येक घरातल्या गृहिणीला ऐकायला मिळतंचं. माझ्या घरातही हे वाक्य विकेंड जवळ आला की कानावर येतं.
दर बुधवारी मुलाच्या शाळेच्या डब्यात चिट डे म्हणून पोळी भाजी व्यतिरिक्त काहीतरी हवं असतं. अशावेळी कधी घावन,पास्ता, सॅण्डवीच, डोसा, इडली असे पदार्थ दिले जातातच. पण कधी त्या पदार्थांचाही कंटाळा येतो. पण चमचमीत खाण्याची डिमांड मात्र कायम असते. अशावेळी काय करायचं हा प्रश्न पडतो.
अशावेळी कधीतरी भाकरी करायची इच्छा होते. भाकरीबरोबर पिठलं आवडतं. पण जास्त आवडतं भरलं वांगं. ताटात मसालेदार भरलं वांग, भाकरी, ठेचा, कांदा... अहाहा. ही भट्टी उत्तम जमली की घरातल्यांचं चित्त आणि पोट दोन्ही प्रसन्न होतं. माझ्या घरी ओला नारळ, थोडासा कांदा, चिंच, गुळ, तिखट, गोडा मसाला, मीठ, कोथिंबीर हा मसाला भरल्या वांग्यासाठी वापरला जातो. पण माझ्या सासरी ओल्या नारळाचं प्रमाण जरा कमीच असतं. दाण्याचं कूट, कांदा लसूण मसाला मात्र आवर्जून वापरला जातो. अशा प्रकारची भरली वांगी चवीला फार छान असते. कांदा लसूण मसाल्याने भाजीला खरी रंगत येते.
माझा नेहमीचा कांदा लसूण मसाला संपत आला होता. त्यामुळे नवीन मसाला आणायचा होता. गोडा मसाला, पावभाजी मसाला यांची उत्तम चव जिभेवर रेंगाळत असल्याने डायरेक्ट 'PSM' चा कांदा लसूण मसाला मागवला. PSM Kanda Lasun Masala चे रिव्ह्यूही वेबसाईटवर फार छान होते. त्यामुळे मोहात पडून मसाला मागवला. मसाला घरी आल्यावर पाकीट उघडले आणि एक ठसका लागला. चव बघितली आणि अहाहा असं आपसूकच तोंडातून आलं. त्या मसाल्यात लसणीचा ठसका आणि कांद्याचा खमंगपणा याचं परफेक्ट मिलाफ होता.जेव्हा मसाला घरी आला तेव्हा कांदा-बटाटा रस्सा केला होता. त्यात थोडा मसाला वापरून पाहिला. भाजी आणखी चवदार झाली होती. त्या दिवशी नेहमीप्रमाणे केलेला रस्सा कमी पडला.घरच्यांनी हा मसाला बेस्ट असल्याची पावतीच दिली होती. चार दिवसांनी जेव्हा भरली वांगी केली. तेव्हा मसाला करताना थोडा हा मसाला घातला.शिवाय थोडा ग्रॅव्ही करतानाही घातला. ग्रॅव्हीला लाल रंग आला होता. चव एकदम फर्मास जमली होती.भरली वांगी शिजत असताना त्याच्या सुगंधाने घरच्यांची भूकही खवळली. अर्थात या मसाल्यामुळे भरली वांगी एक नंबर झाली हे वेगळं सांगायला नकोच. कांदा आणि लसणाची चव योग्य प्रमाणात उतरत असल्याने हा मसाला वापरताना मजा येते. त्यामुळे अनेक पदार्थांमध्ये मी कांदा लसूण मसाला आवर्जून वापरते.
मिसळ करताना तर्रीत हा मसाला घातल्यावर फर्मास मिसळ होते. तर्री थोडी तिखट हवी असेल तर थोडा मसाला वाढवायचा. खाताना ठसका लागलाच म्हणून समजा. पण हो म्हणून मात्र मिसळ जळजळीत होत नाही, तर चवदार होते.
नुकतीच माझी मैत्रीण घरी आली होती. तेव्हा मी भरली वांगी केली होती. तीला भाजी आवडली म्हणून तिने कांदा लसूण मसाल्याची चव बघितली तर तिलाही तो जाम आवडला. तीने थोडा मसाला घरी नेला. आणि चिकन रस्सा केला. तिचाही रस्सा फर्मास झाला होता. आता तीही हा मसाला ऑर्डर करणार आहे. तुम्ही कसली वाट बघताय, जेवण फर्मास करयाचं असेल तर हा मसाला हवाच आपल्या स्वयंपकघरात. चला लवकर ऑर्डर करा या लिंक वरून - PSM Kanda Lasun Masala | PSM Foods (punespice.com).
लेखिका - भक्ती सोमण-गोखले
(लेखिका मुक्त पत्रकार असून, फूड बिझनेस प्रमोशन करणारे Three Cheers हे YouTube चॅनल चालवितात.)