गोडा मसाला - दरवळ माहेरचा
आपल्या भारतीय जेवणात रंगत आणतात ते मसाले. या मसाल्यांचा योग्य वापरामुळे आपलं जेवण चविष्ट होतं. म्हणूनच आपल्या सर्वांच्या स्वयंपाकघरात विविध मसाले दिमाखात मिरवत असतात. आता हेच बघा ना साधी दही काकडी करतानाही त्यात जिरं पावडर, मीठ, साखर, कोथिंबीर घालून सर्व योग्य आहे अशी चव बघितली तरी खाल्ल्यावर अहाहा वाटतं. दह्याचा गोडवा आणि जिरा पावडरमुळे त्या पदार्थाला नजाकत आलेली असते. हे झालं साधं उदाहरण. पण रोजच्या जेवणासाठी आपल्याला तिखट आणि विविध मसाले लागतातच.
आपल्याकडे मसाले तरी किती विविध प्रकारचे. गोडा मसाला, मालवणी मसाला, आगरी मसाला, कांदा लसूण मसाला, कोल्हापूरी मसाला, अशी ही यादी न संपणारी. हे मसाले गृहिणीच्या स्वयंपाक कौशल्यात भर घालतात. तिची मेहनत आणि योग्य तो मसाला प्रमाणात वापरून केलेला तो पदार्थ घरच्यांचा आवडीचा होतोच. मला आठवतं माझ्या आईने भाज्या घालून साधी खिचडी केली तरी त्याचा दरवळ घरभर पसरायचा आणि त्या सुंगधानेच भूक खवळायची. मग गरम गरम खिचडी त्यावर तूप, कोथिंबीर आणि नारळ घालून ती चविष्ट खिचडी खाताना आम्ही म्हणायचो ही खिचडी खावी तर आईच्या हातची. तसंच आमटीचंही असायचं. आईच्या हातची आमटी खायला बाबांच्या ऑफिसमधून फर्माईश असायची. जसा मी स्वयंपाक करायला लागले आईकडून शिकू लागले तेव्हा ती करते तो मसाला कोणता हे कळू लागलं. आधी नावावरून तो मसाला चवीला गोड असावा असं वाटलं. पण मसाल्याचं नाव जरी गोडा मसाला असलं तरी त्याच्यात खडे मसाले वापरले जातात हेही कळलं. आणि हा मसाला जेव्हा वापरून पाहिला तेव्हा पदार्थ का इतका सुंदर होतो याविषयी खात्रीच पटली.
मग मीही आईच्या मदतीने गोडा मसाला घरी करून पाहिला. धने, जिरं, शहाजिर, लाल मिरच्या. सुकं खोबरं, तीळ, लवंग, दालचिनी, मिरे, दगडफूल हे वेगवेगळं थोड्याश्या तेलात खरपूस भाजून घेतलं. आणि गार झाल्यावर मिक्सरमधून काढून सगळं एकत्र केलं. मसाला झाल्यावर संध्याकाळी लगेच आईने सांगितल्याप्रमाणे साधी खिचडी केली. त्यात हा ताजा केलेला गोडा मसाला घातला. थोड्यावेळाने तोच गेल्यावेळप्रमाणे दरवळ घरात पसरला. गॅस बंद करून लगेचच चव पाहिली. तेव्हा ही खिचडी आईप्रमाणे झाली होती. आईच्या हातच्या चवीच एक मसालेदार रहस्य मला सापडलं होतं. मग काय दुसऱ्या दिवशी आमटी केली तेव्हा तर बाबांना चव खूपच आवडली. गोडा मसाला मग मी आईच्या मदतीने घरीच करायला लागले. या गोड्या मसाल्यामुळे आमचे सण-उत्सवही अगदी लक्षात राहतील असे झाले.
कुठलाही सण असला की घरात पारंपारिक पदार्थ करण्याकडे आपला कल असतो. मग गणपती, दसरा, दिवाळी असे सण त्याला अपवाद नाहीत. जेवणात गोड पदार्थ बदलत राहतात तसेच तिखट पदार्थ, भाताचे प्रकारही बदलतातच. जसं गणपतीला उकडीचे नाहीतर तळणीचे मोदक हवेतच हवेत. डाव्या बाजूला चटणी, कोशिंबीर हवी. पोळी किंवा पुरी, बटाट्याची भाजी, जमल्यास उसळ त्याचबरोबर अनेक घरात मसाले भात तर हमखास केला जातो. हे इतके पदार्थ खाऊन मसाले भात कोण खाणार असा प्रश्न पडणं साहजिकच आहे. पण गणपतीला नैवैद्य दाखवताना जेव्हा इतर पदार्थ नजरेत भरतात. तसे सुगंधामुळे मसाले भातही हमखास खाल्ला जातो, हा अनुभव आहे. उसळीत घातलेला गोडा मसाल्यामुळे तीही चटकदार होते. त्यामुळे सणासुदीला साग्रसंगीत, चविष्ट असा स्वयंपाक करताना गोडा मसाला हा हवाच!
गेली दोन वर्ष कोरोनामुळे आपण सण- उत्सव आनंदात साजरे करू शकत नव्हतो. अनेकांना आरोग्याच्या तक्रारी भेडसावल्या.२ वर्षानंतर ऑफिसही सुरू झाली आहेत. त्यामुळे उत्सव साजरा करतानाचा आनंद असला तरी रोजच्या धावपळही त्यात आहे.अशावेळी गणपतीच्या सामानाची यादी करताना गोडा मसाला संपलाय हे माझ्या लक्षात आलं. चांगल्या आणि घरगुती चव असलेल्या गोड्या मसाल्याच्या शोधात असताना फेसबुकवर 'PSM' मसाल्यांची जाहिरात बघितली. त्यातला गोडा मसाला मी करते तसाच तयार केलाय असं वाटलं. म्हणून म्हटलं हा मसाला ट्राय करूया. ऑर्डर दिल्यावर दोन दिवसातच PSM Goda Masala घरी आला. बरणी फोडली तेव्हा, हो बरणी, आजकाल कोण बरणी मध्ये मसाले देतं? हि ही PSM ची एक खासियतच. आई गोडा मसाला करताना जो दरवळ यायचा तोच दरवळ या मसाल्यालाही आला. चाखून बघितला तर आईच्या हातची चव लागली. क्षणभर माहेरीच गेले मी... संध्याकाळी ऑफिसमधून ओढीनेच घरी आले आणि वेळ न दडवता मसाले भात केला. माहेरी करायचे तोच दरवळ घरभर घुमला. त्या ओढीने नवरा- मुलं लगेच जेवायला आली. एक घास खाल्ल्यावर सर्वांनीच प्रचंड आवडल्याची पावती दिली. पीएसएमच्या गोड्या मसाल्याने माझी ती संध्याकाळ यादगार केली. यावर्षी गणपतीला मी हाच गोडा मसाला घालून मसाले भात करून घरच्यांना खुष करणार आहे. तुम्हीही लवकर हा मसाला विकत घ्या आणि तुमचे जेवणाचे क्षण यादगार करा.
🔗🛒 Shop Now PSM Goda Masala / त्वरित घरी मागवा PSM Goda Masala
Author/लेखिका-
भक्ती सोमण-गोखले
(लेखिका मुक्त पत्रकार असून, फूड बिझनेस प्रमोशन करणारे Three Cheers हे YouTube चॅनल चालवितात.)
bhaktigokhale2021@gmail.com
5 Comments
मस्त लेखन.
खूपच छान , मसाल्यांशिवाय जेवण होऊच शकत नाही. ताज्या मसाल्यांची बातच न्यारी
Very informative blog गोडा मसाला
Thank you so much Ma’am
Very informative blog गोडा मसाला
Thank you so much Ma’am
Very nice all the best